जळगाव महापालिका निवडणुक, प्रभागात ६ तरुण नगरसेवक लाभले
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. प्रभाग ३, ४ मध्ये भारतीय जनता पक्षाला ६, शिवसेना शिंदे गटाला २ जागा मिळाल्या.

प्रभाग ३ अ मध्ये भाजपच्या अर्चना संजय पाटील यांना ८ हजार ३२८ मते मिळाली. अपक्ष मीना धुडकु सपकाळे यांना २ हजार ७६५ मते मिळून दुसरा क्रमांकावर आले. अपक्ष वृषाली भारुळे यांना १ हजार ४१८ मते, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली धीरज भालेराव यांना १ हजार ८५ मते मिळाली. ऐश्वर्या सुरेश पवार यांना २१५, नोटाला ६७६ मते मिळाली. प्रभाग ३ ब मध्ये भाजपचे प्रतीक्षा कैलास सोनवणे यांना ४ हजार ८८६, अपक्ष चैताली राहुल ठाकरे यांना ४ हजार ७३८ मते मिळाली. प्रतीक्षा सोनवणे हि १४८ मतांनी निवडून आली. अपक्ष माजी नगरसेवक रंजना सपकाळे यांना ३ हजार ४०५, काँग्रेसचे ममता सोनवणे यांना ३९९, वर्षा गणेश सोनवणे ५३६, कांचन सोनवणे यांना ९७, नोटा ४२७ मते पडली.
३ क मध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रवीण रामदास कोल्हे यांना ८ हजार ५८१ तर अपक्ष प्रमोद शांताराम शिंदे यांना २ हजार ५७३ यांना मते मिळाली. प्रवीण कोल्हे हे ६ हजार ८ मतांनी विजयी झाले. अपक्ष आकाश सोनवणे यांना १ हजार ३३४, काँग्रेस पक्षाचे कविता मिलिंद सपकाळे यांना ८८२, तर शिवसेना उबाठा पुरस्कृत डॉ. सुषमा दीपक चौधरी यांना ४५३ मते मिळाली. ६६३ जणांनी नोटा हे बटन दाबले. ३ ड मध्ये भारतीय जनता पक्षाचे निलेश विश्वनाथ तायडे उर्फ निलू आबा यांना ५ हजार ६७७ मत मिळाली तर अपक्ष भरत शंकर सपकाळे यांना ४ हजार ७२४ मते मिळाली. निलेश तायडे यांनी भरत सपकाळे यांचा ९५३ मतांनी पराभव केला. अपक्ष ललित विजय नारखेडे यांना १ हजार ४३१, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल मोहन पवार यांना ९२१, आम आदमी पक्षाचे योगेश भोई यांना २१६, काँग्रेसचे मिराबाई सोनवणे यांना २२५, अपक्ष प्रदीप आव्हाड यांना २४६, भीमराव तायडे यांना ४४१, सोनाली मनोहर बाविस्कर यांना २७७ मते मिळाली. तर ३२८ जणांनी नोटा हा पर्याय स्वीकारला.
प्रभाग क्र. ४ अ येथे भारतीय जनता पक्षाचे शशीबाई शिवचरण ढंढोरे यांना ७ हजार ७४५ मते तर शिवसेना ठाकरे गटाचे सोनम निलेश जावळे यांना ४ हजार २८५ मते मिळाली. भाजपाचे शशीबाई ढंढोरे या ३ हजार ४६० मतांनी विजयी झाले. अपक्ष कंचन चेतन संकत यांना १५८३, तर अपक्ष जितेंद्र बागरे यांना ३६३, मते, नोटाला १ हजार २ मते मिळाली. ४ ब मध्ये भाजपाचे विद्या मुकुंदा सोनवणे यांना ६ हजार ३५८ तर अपक्ष चेतना किशोर चौधरी यांना ३ हजार १३३ मते तर शिवसेना ठाकरे गटाचे बेबाबाई सुरेश चौधरी यांना २ हजार ९८४ मते मिळाली. विद्या सोनवणे यांनी ३ हजार ३७४ मतांनी चेतना चौधरी यांचा पराभव केला. अपक्ष कोकिळा पाटील यांना १९०८ मते तर नोटाला ५९५ मते मिळाली.
४ क मध्ये भाजपाचे कल्पेश कैलास सोनवणे यांना ८ हजार ३५८ तर शिवसेना ठाकरे गटाचे मयूर श्रावण बारी यांना ४ हजार २०४ मते मिळाली. मयूर बारी हे ४१५४ मतांनी पराभूत झाले. अपक्ष चेतन गणेश सनकत यांना १६२७ तर नोटाला ७८९ मते मिळाली. ४ ड मध्ये शिवसेनेचे पियुष ललित कोल्हे यांना ९ हजार ९५८ मते मिळाले तर शिवसेना ठाकरे गटाचे शरीफ काकर यांना २५८२ मध्ये प्राप्त झाली. पियुष कोल्हे हे ६ हजार ९७६ मतांनी विजयी झाले. मनसेचे प्रकाश जोशी यांना ५३८, आम आदमी पक्षाचे संजय निकुंभ यांना २५९, समाजवादी पार्टीचे सय्यद वाजिद यांना १२२५ मते, तृप्ती पाटील यांना २०७ मते तर नोटाला ६२० मते मिळाली.









