जळगाव महापालिकेत महायुतीची मुसंडी; बहुमताकडे निर्णायक वाटचाल


प्रभागनिहाय विजयी घौडदौडीत महायुतीचा झेंडा उंचावला
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात होताच महायुतीच्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच विजयी घौडदौड सुरू केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकामागून एक प्रभागांमध्ये मिळालेल्या आघाडी आणि विजयामुळे महापालिकेवर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित होत असून बहुमताकडे वाटचाल जवळपास निश्चित झाली आहे.
प्रभाग क्रमांक एक मध्ये पहिले तीन भाजप विजय ड मध्ये अपक्ष भारती सागर सोनवणे यांचा विजय झाला आहे.
प्रभाग क्रमांक २ आणि ३ मध्ये महायुतीच्याचार उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर प्रभाग क्रमांक ४ मध्येही महायुतीचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मध्ये महायुतीच्या शुचिता हाडा यांच्यासह अन्य उमेदवारांनी विजयाकडे ठोस वाटचाल केली आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक ८, ९ आणि १० मधून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून प्रभाग 11 चारही शिवसेना चैताली ठाकरे यांचा विजय झाला आहे. , प्रभाग क्रमांक १२ मधून भाजपचे चारही उमेदवार दणदणीत विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक १३ मध्ये प्रफुल्ल देवकर यांनी विजय मिळवला असून उर्वरित तीन उमेदवार आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक १४ मध्ये महायुतीचे चारही उमेदवार विजयी, तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये महायुतीच्या चारही उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १६ मध्ये महायुती आघाडीवर असून प्रभाग क्रमांक १७ मध्ये मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. तथापि, प्रभाग क्रमांक १८ आणि १९ मध्ये पुन्हा महायुतीच्या उमेदवारांनी विजयाकडे ठोस वाटचाल केली आहे.
एकूणच मतमोजणीच्या आतापर्यंतच्या टप्प्यात जळगाव महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार हे स्पष्ट झाले असून, महापौरपदावरही महायुतीचाच उमेदवार विराजमान होणार असल्याचे राजकीय चित्र स्पष्ट होत आहे.








