भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे जनतेला आवाहन
पिंप्राळ्यात झाली जाहीर सभा
जळगाव विशेष प्रतिनिधी

जळगावात चांगला प्रतिसाद पाहता महायुती जोरदार निवडून येणार, यामध्ये मला काही शंका नाही. २०४७ ला एक विकसित भारत म्हणून आपल्याला पाऊल उचलायचे आहे. त्यासाठी महायुतीचे नेते जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आपली साथ हवी आहे, अशी साद भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीचा मेळावा रविवारी दि. ४ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खा.स्मिता वाघ, आ. मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, आ. किशोर आप्पा पाटील, आ. अमोल जावळे, राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख संजय पवार व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला बिनविरोध आलेल्या महायुतीच्या १२ नगरसेवकांचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर महायुतीचा वचननामा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

प्रसंगी काही उमेदवारांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रसंचालनातून विशाल त्रिपाठी यांनी दिली. यामध्ये १३ ब मध्ये सुरेखा तायडे यांना अपक्ष व भाजप कार्यकर्ते प्रिया विनोद तायडे, १० ड मध्ये जाकीर खान पठाण यांना शेख अहमद नूर, अपक्ष, १० क मध्ये कविता शिवदे यांना अपक्ष नीलूताई संजय इंगळे यांनी, ८ क मध्ये भाजपा बंडखोर माजी नगरसेवक विजय पाटील यांनी अमर जैन यांना तर १६ क मध्ये रंजना वानखेडे यांना शिवसेनेचे कार्यकर्ते व अपक्ष उमेदवार मीनल हर्षल मावळे यांनी पाठिंबा दिला. तर ९ ड मध्ये डॉ. चंद्रशेखर पाटील यांना राज कोळी यांनी जाहीर पाठिंबा दिला.
यानंतर गुलाबराव देवकर, आ. किशोर आप्पा पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार भाषणे करून महायुतीला संदर्भामध्ये आवाहन केले. मेळाव्याच्या आधी भवानी माता मंदिर येथे दर्शन घेऊन महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आभार प्रदेश सरचिटणीस नितीन इंगळे यांनी केले.









