• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महावितरणतर्फे वसुली मोहीम : बड्या थकबाकीदारांची नावे आता जाहीर करणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात महावितरणने वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार आवाहन करूनही बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा चालू डिसेंबर महिन्यात खंडित करण्यात आला असून, आता या कारवाईची व्याप्ती अधिक वाढवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राजकीय वरदहस्त असलेल्या आणि आर्थिक संपन्न असूनही देयके न भरणाऱ्या ‘बड्या’ थकबाकीदारांची नावे आता सार्वजनिकरीत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याच्या हालचाली महावितरणतर्फे सुरू करण्यात आल्या आहेत.

जळगाव परिमंडलात सध्या थकबाकीचे संकट गडद झाले आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात कृषी वर्गवारी वगळता सुमारे साडेसहा लाख लघुदाब ग्राहकांकडे महावितरणची 1103 कोटी 23 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात जळगाव जिल्ह्यात 556 कोटी 53 लाख, धुळे जिल्ह्यात 322 कोटी 10 लाख व नंदुरबार जिल्ह्यात 224 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे, अनेक ग्राहकांनी वर्षभरापासून एक रुपयाचाही भरणा केलेला नाही. यामुळे महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

मुजोर ग्राहकांविरोधात कारवाईच्या सूचना

मुजोर ग्राहकांविरोधात थेट पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्याच्या सूचना महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी परिमंडलातील सर्व अभियंत्यांना दिल्या आहेत.

तर वीजबिलासाठी रांगेत उभे रहायची गरज नाही..

गेल्या काही वर्षांत ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागू नये, त्यांचा वेळ वाचावा, यासाठी महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यूपीआय नेट बँकिंग, वॉलेट्स, मोबाईल अॅप्सवरील फोन पे, गुगल पे आणि महावितरणच्या वेबसाइटद्वारे घरबसल्या वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त होणार कारवाई

थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. काही संवेदनशील भागांत कर्मचाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, ही कारवाई आता पोलिस बंदोबस्तात केली जाणार आहे. महावितरणने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारची गुंडगिरी किंवा राजकीय दबावाला बळी न पडता ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कारवाई टाळण्यासाठी थकबाकी भरा..

महावितरणतर्फे थकबाकीदार ग्राहकांना थकित विजबिल भरण्याबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात येत असते. मात्र, तरीदेखील थकबाकी न भरणाऱ्या जळगाव परिमंडलातील सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा चालू डिसेंबर महिन्यात खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर मात्र हे ग्राहक लागलीच पैशांची जमवाजमव करून, काही तासांत वीजबिल भरतात. त्यानंतर पुन्हा महावितरणचे कर्मचारी या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करत आहेत.

बड्या थकबाकीदारांची ‘नावे’ होणार जाहीर

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक धनवान व्यक्तींकडे लाखो रुपयांचे वीजबिल थकीत आहे. मात्र, वीजबिल भरण्याबाबत नोटीस बजावूनही संबंधितांकडून दाद दिली जात नाही. अशा ग्राहकांकडे महावितरणचे कर्मचारी कारवाईसाठी गेल्यावर राजकीय वजन वापरून कारवाई टाळण्याचा प्रकार केला जात आहे. त्यामुळे या बड्या थकबाकीदारांची नावे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. वृत्तपत्रांतून नावे प्रसिद्ध केल्यावर या थकबाकीदारांना ऐन निवडणुकीच्या वेळेस सामाजिक स्तरावरही चपराक बसणार आहे. अलिकडेच महावितरणने मनपा प्रशासनाला पत्र देऊन उमेदवारांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे.

महावितरणतर्फे सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी तातडीने थकीत वीजबिल भरणे नियमाने गरजेचे आहे. अन्यथा महावितरणचे कर्मचारी कधीही त्यांच्या घरी जाऊन वीज पुरवठा खंडित करू शकतात. तसेच काही मोठ्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रातुन प्रसिद्ध करून, त्यांच्यावरही लवकरच कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे थकित वीज बिलभरून महावितरणला सहकार्य करावे.

आय.ए. मुलाणी, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव परिमंडल


 

 

Tags: mahavitrantarfe vasuli mohim
Previous Post

एक कोटीची खंडणी मागून केले अपहरण, नंतर व्यापाऱ्याचा खून करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकला !

Next Post

रस्ते अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

रस्ते अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस
1xbet russia

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon