तांत्रिक कर्मचारी घेताहेत विद्युत सुरक्षेची शपथ
जळगाव ( प्रतिनिधी ) – विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देत ‘शून्य विद्युत अपघात’ उदिद्ष्टासाठी महावितरणने राज्यातील उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी किंवा आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाची सुरवात विद्युत सुरक्षा शपथेने करण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारेनुकतेच दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत विद्युत सुरक्षिततेचे महत्त्व रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी शून्य विद्युत अपघात उद्दिष्टाची प्रभावी व सातत्याने अंमलबजावणी करण्याची सूचना केली.त्याप्रमाणे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी विद्युत सुरक्षेबाबतउपाययोजना व लोकसहभागातील उपक्रमांना वेग दिला आहे. ‘अभियंते व कर्मचाऱ्यांसाठी विद्युत सुरक्षा ही केवळ नियमावली नसून दैनंदिन कामाचा एक भाग आहे. प्रत्येक जीव मौल्यवान असल्याने’शून्य विद्युत अपघात’ हेच महावितरणचेध्येय आहे. त्यामुळे विद्युत सुरक्षेचेकायम तंतोतंत पालन करावे’, असे आवाहन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केले आहे.
विद्युत सुरक्षेबाबत सजग व सतर्क राहावे यासाठी महावितरणच्या ६६४ उपविभाग व ३२९१ शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवार हा सुरक्षा दिवस ठरविण्यात आला आहे. प्रत्येक सोमवारी किंवा आठवड्यातील कामाच्या पहिल्या दिवशी या दोन्ही कार्यालयातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी सकाळी कामाची सुरुवात सुरक्षा शपथेने करीत आहे. त्यानंतर सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्यावैयक्तिक सुरक्षा उपकरणे व तांत्रिक साधनांची तपासणी करण्यात येत आहे. ते सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतरच क्षेत्रीय कामांना सुरुवात होत आहे.
यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांसोबत आयोजित सर्व बैठकींची सुरवात देखील विद्युत सुरक्षाशपथेनेचकरण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीसुरक्षा अधिकारी म्हणून मंडलस्तरावरकार्यकारी अभियंता (प्रशासन) आणि विभागस्तरावरअतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्यावर देण्यात आली आहे.
केंद्रीय विद्युत प्राधीकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारमहावितरणनेकर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या विद्युत सुरक्षेसाठी विविध उपाययोजना व उपक्रमांना मोठी गती दिली आहे.जून २०२५ मध्ये महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्तविद्युत सुरक्षेच्या जनजागृतीसाठी राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये तब्बल २ लाख ११ हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यासह २ कोटी ८५ लाखवीजग्राहकांना विद्युत सुरक्षेचाथेट वैयक्तिक संदेश देण्यात आला. या अभियानाचीजागतिकस्तरावर नोंद घेण्यात आली. तसेच सुरक्षितपणे देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांनामहावितरणकडून २० ते २५ प्रकारचे वैयक्तिक व कॉमनसुरक्षा साधने देण्यात येतात. ही सुरक्षा साधने आवश्यकतेनुसार व मागणीप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्यासाठी स्वतंत्र ‘टी अॅण्ड पी रजिस्टरमॉड्यूल’कार्यान्वित करण्यात आले आहे.









