जळगाव (प्रतिनिधी ) ;- महावितरणच्या जळगांव परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री कैलास हुमणे हे शुक्रवार दि.28 जून रोजी, महावितरणच्या 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. जळगांव येथे आयोजीत एका समारंभात समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता श्री अनिल महाजन होते.
समारंभ प्रसंगी व्यासपीठावर सौ.ममता हुमणे यांच्यासह सेवानिवृत्त कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता भरत जाडकर, सुरेश गणेशकर, धुळ्याचे अधिक्षक अभियंता निरज वैरागडे, अनिल बोरसे, पायाभूत आराखडा विभागाचे मनोज विश्वासे, सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थीती होती.
समारंभाला श्री कैलास हुमणे यांचे कुटुंबिय, आप्तेष्ठ, नातेवाईक, मित्र परिवार, महावितरणचे सर्व अधिकारी-कर्मचारी, वीज कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. महावितरणच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त देण्यात येणारे प्रमाणपत्र, शाल, श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात आला. मंडल, विभाग, उपविभाग आणि विविध संघटनास्तरावरुनही त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.