जोहान्सबर्ग(वृत्तसंस्था ) ;- महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पणतीवरती सहा दशलक्ष रुपयांची फ्रॉड केस दाखल झाली होती.तिला आता डर्बन कोर्टने सात वर्षांची कैद सुनावली आहे. आशिष लता रामगोबिन यांना सोमवारी कोर्टाने दोषी ठरवले.त्यांच्यावर ‘एस.आर. महाराज’ या उद्योगपतींबरोबर फ्रॉड केल्याचा आरोप आहे. त्यांनी महाराज यांच्याकडून ६.२ लक्ष रूपये आगाऊ घेतले होते,भारताकडून माल आयात करण्याच्या वचनावरून तसंच सीमाशुल्क सुद्धा त्यांनी आकारले होते . मिळविलेल्या नफ्याचा भाग सुद्धा महाराज याना देण्याचे वचन ‘आशिष लता रामगोबिन’ यांनी दिले होते,याच प्रकरणावरून त्यांच्यावर फ्रॉडची केस दाखल झाली होती. जिच्यावर निर्णय देताना डर्बन कोर्टने त्यांना ७ वर्षांची कैद सुनावली आहे .