निरीक्षकांच्या उपस्थितीत निवड, बैठकीत विविध विषयांवर चर्चा
जामनेर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जामनेर शाखेच्या अध्यक्षपदी उत्तमसिंग उमेदसिंग पाटील, कार्याध्यक्षपदी बी.आर. पाटील व प्रधान सचिवपदी प्रतिभा नरवाडे दाभाडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी २०२५ या एक वर्षाची आहे.
नुकत्याच झालेल्या साप्ताहिक बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीला निरीक्षक म्हणून जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बो-हाडे उपस्थित होते. शाखेचे कार्याध्यक्ष बी.आर पाटील यांनी प्रास्ताविक तर जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे यांनी सघटना उभारणीबाबत माहिती दिली.
सभासद नोंदणीबाबत आढावा घेण्यात आला. समितीच्या विधायक कार्याला पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्य ठेवले पाहिजे असे सांगून निरीक्षक प्रल्हाद बो-हाडे यांनी आळंदी येथे झालेल्या समितीच्या ३५ वर्षपूर्ती अधिवेशनाची माहिती दिली. यानंतर एकमताने २०२५ या वर्षाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक उत्तमसिंग उमेदसिंग पाटील यांची तर उपाध्यक्षपदी रमेश गायकवाड व जितेंद्र गोरे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष व प्रधान सचिव या महत्वाच्या कार्यकारी पदांवर अनुक्रमे बी.आर. पाटील व प्रतिभा नरवाडे दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे.
जामनेर शाखेची कार्यकारिणी – २०२५
१)अध्यक्ष : उत्तमसिंग उमेदसिंग पाटील
२)उपाध्यक्ष : रमेश देवबा गायकवाड
३)उपाध्यक्ष: जितेंद्र रामकृष्ण गोरे
४)कार्याध्यक्ष : बी.आर. पाटील
५)प्रधान सचिव : प्रतिभा नरवाडे दाभाडे
६)विविध उपक्रम विभाग: युवराज शंकर सुरळकर
७)वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प : दिलीप शेनफडू पाटील
८)बुवाबाजी संघर्ष विभाग: रामदास सुभाष सोनवणे
९)प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग: विजय रामचंद्र सैतवाल
१०)विवेक जागर प्रकाशन व वितरण विभाग: प्रदीप अमृत गायके
११)अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग: तीर्थराज प्रल्हाद सुरवाडे
१२)निधी व्यवस्थापन विभाग: किशोर धांगो सोनवणे
१३)महिला सहभाग विभाग : सुशिला वसंत चौधरी
१४)युवा विभाग : नवल भीमराव ठोंबरे
१५)सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग: राजेश्वरी रवींद्र राजपूत
१६)मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग: डॉ. चंद्रमणी एकनाथ सुरवाडे
१७)कायदेविषयक व्यवस्थापन विभाग: एड. राजू शिवाजी मोगरे
१८)जात पंचायत मूठमाती अभियान विभाग: तीर्थराज तुकाराम इंगळे
१९)मिश्र विवाह प्रोत्साहन विभाग: प्रा. एकनाथ शिनफड सुरवाडे
२०)जोडीदाराची विवेकी निवड विभाग: सोपान किसन पारधी
२१)सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग: पुंडलिक सोनजी चौधरी
२२)विज्ञान बोध वाहिनी विभाग: मधुकर शामा आगारे
२३)विवेक वाहिनी विभाग: सहदेव बळीराम निकम
२४)दस्तावेज संकलन विभाग: विनोद काशिनाथ जाधव