बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी
जळगाव ( प्रतिनिधी ) – आमदार सुरेश भोळे तथा राजुमामा यांनी महामार्गावर होणाऱ्या अपघातांसंदर्भात जिल्हाधिकारी त्यांच्याशी चर्चा केली. तात्काळ उपायोजना करून अपघात रोखावे यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी केली.

जळगाव शहरातून जाणाऱ्या हायवेवर दररोज होणाऱ्या अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागतो आहे. यावर पर्याय व्यवस्था हायवे बायपासचे काम व रस्त्याच्या कामाचे हायवेवर होत असणारे अतिक्रमण याचा आढावा घेतला व काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. जेणेकरून नागरिकांचा जीव धोक्यात राहणार नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा केली. सदर केलेल्या सूचना ऐकून लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना केल्या जातील असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.