जळगाव (प्रतिनिधी) – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त अभिवादन करण्यात आले.
आज १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रूग्णालयात मुख्य नर्सिंग अधीक्षक कार्यालयासमोर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील तसेच डॉ. वैभव पाटील यांचे हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कार्य व विचारांवर आधारित भाषणे सादर करण्यात आली.नर्सिंग सुपरवायझर व स्टाफ नर्स यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला.










