रेल्वे प्रशासनाचे नियोजन
कुंभ मेळा विशेष गाडी क्रमांक ०९०१९ दिनांक २३ फेब्रुवारी रोजी वलसाड येथून ८.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे पोहोचेल. कुंभ मेळा विशेष गाडी क्रमांक ०९०२० दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दानापूर येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ९.३० वाजता वलसाड येथे पोहोचेल.
रेल्वेला थांबे : नवसारी,भेस्तान, नंदुरबार,अमळनेर,भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी,मिर्झापूर चुनार, पंडित दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, आरा आणि दानापूर असे आहेत. कोच संरचना: १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १४ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी, २ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन अशी आहे.
या विशेष गाड्यांच्या विस्तृत वेळापत्रक व थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in वेबसाइटला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.