सारजेश्वर महादेव मंदिरासाठी केली विकासकामे
धरणगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सारजेश्वर महादेव मंदिरासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्ता मंजूर करून दिला. तसेच रस्त्याच्या कडेला पथदिवे बसवून दिले. याबद्दल शिवभक्तांनी गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
अतिशय पुरातन असे सारजेश्वर महादेव मंदिर अनेक वर्षांपासून पारोळा रस्त्याच्या कडेला असून, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा दर्शन घेतल्याचे जुने जाणकार सांगतात. या मंदिराकडे धरणगाव शहरातून जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेक भाविकांना अडचण निर्माण होत होती. शहरातील नागरिकांना पारोळा रस्त्याकडून शेताला लागून एका छोट्याशा मातीच्या रस्त्याने दर्शनासाठी त्या ठिकाणी जावे लागायचे व रात्रीच्या वेळेस जाताना तर खूपच अडचणी येत होत्या.
काही भक्तांनी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भेटून रस्त्याची मागणी केली. त्यांनी लागलीच त्या ठिकाणी असलेल्या अडचणी दूर करून काँक्रिटीकरण रस्ता मंजूर केला व रस्त्याच्या कडेला ३ हायमास्ट लाईट लावले. त्यामुळे गुलाबराव पाटील यांचे शिवभक्तांनी आभार मानले. याप्रसंगी विजय शुक्ला, संजय परदेशी, हेमंत चौधरी, नारखेडे, विवेक चौधरी, शहा, बापू जाधव आदी उपस्थित होते.