कोळी समाजाच्या बैठकीत रावेरला विविध विषयांवर झाली बैठक
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- कोळी समाजाच्या प्रमुख मागणीसाठी आज शनिवारी रावेर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात समाजाची बैठक संपन्न झाली. येत्या १० तारखेपर्यंत प्रमुख ४ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा आज रावेर येथे बैठकीत करण्यात आली.
इतर समाजाप्रमाणे कोळी लोकांना जाचक अटी न लावता सुलभ रितीने जात प्रमाण पत्र देण्यात यावे. त्याच प्रमाणे त्यांची जात प्रमाणपत्राची वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील प्रत्येक गावातील कोळी समाजाच्या ग्राम पचायत सदस्य व पदाधिकारी तसेच सरपंच लोकांनी या वेळी हजेरी लावली होती.
यावेळी समाजावर होत असलेल्या अन्यायाबद्दल महत्वपुर्ण वैचारीक भाषणे झाली. त्यात प्रमुख्याने प्रभाकर सोनवणे, उपोषणकर्ते जितेंद्र कोळी, संजय कांडेलकर, विनायक कोळी, ईश्वर कोळी, हरलाल कोळी, शिवा कोळी इत्यादिंची भाषणे झाली.
यावेळी गोकुळ झाल्टे, अशोक सपकाळे, राहुल कोळी, रवि महाले, बंडु कोळी, भागवत कोळी, मनोहर कोळी, राजेंद्र महाले, योगेश कोळी आणि कोळी समाजातील अनेक कार्यकर्ते हजर होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपकाळे यांनी केले तर आभार मनोहर कोळी यांनी केले.