भडगाव पोलीस स्टेशनची कारवाई
भडगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पिंपरखेडजवळ रात्री ३ वाजेच्या सुमारास ४ गावठी पिस्टल व २० जिवंत काडतूस विना परवाना घेऊन येताना मध्यप्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलीसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमालासह संशयित आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई भडगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के, पो. कॉ. प्रविण परदेशी,पो. हे. कॉ. निलेश ब्राम्हणकार, पो. कॉ. महेंद्र चव्हान, पो. कॉ. संदीप सोनवणे आदींनी केली. पो. कॉ. प्रवीण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ८ रोजी रात्री ३ वाजेसुमारास भडगांव ते एरंडोल रोडवर पिंपरखेड गावाच्या अलीकडेस संशयित आरोपी सुनिल बिलदार बारेला (वय ३५, रा. उमर्टी ता. बारला जि. बडवाणी मध्य प्रदेश) हा ०४ गावठी बनावटीचे पिस्टल, २० जिवंस काडतुस असा एकूण १ लाख ७० हजार ३०० रुपयेचा मुद्देमाल घेऊन जात होता. तेव्हा हे शस्त्र विना परवाना कब्ज्यात बाळगतांना मिळून आला म्हणून भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के हे करीत आहे.