तेथे झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावर धूर गेल्याने आग्यामोहोळ मधमाश्यांनी झाडाखाली असलेल्या भाविकांवर हल्ला चढविला. त्यामुळे भाविकांची पळापळ झाली. काहींनी जवळच्या तलावात उडी मारली. यावेळी मालेगावचे फैजल शाह (वय २२), सुपडू शाह (वय ५०), नूराबी शहा (वय ४७), मायोनुद्दीन रजा शाह (वय १७), फिरोजाबी शाह (वय ३७), निकहत फातेमा (वय १८), हुमेराबी शाह (वय १६), वसीम शाह (वय १९), सादिया फातेमा (वय १८) यांच्यासह नाजीम शेख अहमद (वय २०, रा. तांबापुरा, जळगाव) हे भाविक जखमी झाले.
त्यांना कारमध्ये नशिराबाद आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. तेथे प्रथमोपचार झाल्यानंतर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचार करण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर झाल्यावर रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी गर्दी केली होती.