पालमास ( ब्राझील ) ( वृत्तसंस्था ) – ब्राझीलमध्ये एक व्यक्ती मासेमारी करण्यासाठी गेला असता त्याच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांपासून वाचण्यासाठी या मच्छिमाराने तलावात उडी घेतली. मात्र त्याच्या दुर्दैवाने त्या तलावात भरमसाठ जीवघेण्या पिराना मासे होते. तलावात उडी घेताच शेकडो पिराना माशांनी त्याच्या संपूर्ण शरीराचा चावा घेत त्याचा जीव घेतला.
मृत 30 वर्षीय व्यक्ती दोन मित्रांसह मासेमारीसाठी गेला होता. दरम्यान त्यांच्यावर मधमाश्यांची हल्ला केला. मधमाश्यांपासून वाचण्यासाठी या तिघांनी तलावात उडी घेतली. त्यातले दोन तलावातून नंतर बाहेर आले. मात्र तिसरा व्यक्ती बाहेर येऊ शकला नाही. नंतर या व्यक्तीचा किनाऱ्यापासून 13 फुटांवर मृतदेह सापडला. या व्यक्तीचा मृतदेह मिळाला तेव्हा त्याचा चेहरा, कान आणि शरीराच्या काही भागांचा माशांनी चावलेला दिसला.
दक्षिण अमेरिकेतील तलाव आणि नद्यांमध्ये पिरान्हाच्या सुमारे 30 प्रजाती आढळतात. त्याचा जबडा अतिशय तीष्ण असा असतो. हा मासा अत्यंत धोकादायक असून काही सेकंदातच हा मासा भक्ष्याचा शेकडोवेळा चावा घेऊ शकतो. या माशाला पाण्याची हालचाल जाणवताच तो सावध होतो आणि शिकार करण्यास तयार होतो. 2007 मध्ये ब्राझीलच्या पालमास शहराजवळील तलावामध्ये सुमारे 200 पिरान्हा हल्ल्यांची नोंद झाली होती. या हल्ल्यात पिराना माशांनी अधिकतर लोकांच्या पायाचा चावा घेतला होता.