जामनेर (प्रतिनिधी) – माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यातर्फे कोकणातील महापूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार्या पॅकेटच्या स्वरूपातील मदत आज जीएम फाऊंडेशनच्या कार्यालयातून रवाना आज सायंकाळी 4 वा करण्यात येणार आहे.


सध्या कोकणात पावसामुळे अतिशय बिकट परिस्थित निर्माण झाली आहे. यात विशेष करून महाड व चिपळूण तालुक्यात अक्षरश: हाहाकार उडाल्याचे दिसून येत आहे. आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर व आमदार निरंजन डावखरे यांच्यासह चिपळूण येथे मदतकार्यासाठी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, असंख्य महापूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याची दखल घेऊन आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार्या तब्बल दहा हजार पॅकेटच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. आज जळगाव येथील जी. एम. फाऊंडेशनच्या कार्यालयातून ही मदत महाड आणि चिपळूण येथे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती जामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी दिली आहे







