पोलीस अधीक्षकांसह ठसे तज्ञ् आणि डॉगस्कॉडच्या पथकाची घटनास्थळी पाहणी
यावल : – शहरात आज एका दुचाकीवरून आलेल्या चौघांनी सराफाला पिस्तुलाचा धाक दाखवून सुमारे ११ लाखांच्या दागिन्याची लूट झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली . दरोडेखोरांनी सुमारे २४० ग्रॅम सोन्यासह ५५ हजारांची रोकड लांबवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली. दरोड्याच्या अनुषंगाने त्यांनी यावलला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जगदीश कवडीवाले यांचे मुख्य बाजारपेठेत बाजीराव काशिनाथ कवडीवाले नामक सराफा दुकान आहे. दुकानात जगदीश कवडीवाले हे दुकानात बसले असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास २२ ते २५ वयोगटातील मास्क लावलेले तीन तरुण दाखल झाले व त्याचवेळी चौथा संशयीत दाखल झाल्यानंतर त्याने दुकानाचे शटर लावून घेतले. कवडीवाले यांना दरोड्याचा अंदाज आल्याने त्यांनी हालचाल करताच दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी देऊन दरोडेखोरांनी काऊंटरवरील काच फोडत त्यातील दागिने पिशवीत भरून अवघ्या पाच मिनिटात लूट करून पोबारा केला . पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.







