जामनेर (प्रतिनिधी ) ;- जामनेर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वरिष्ठ विभागात कार्यरत असलेले प्रा.डॉ.विजयेंद्र विश्वनाथ पाटील सहाय्यक प्राध्यापक मराठी यांचे ‘लोकरंगभूमी’ यापुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ६ रोजी झाले.रप्रकाशन हे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, प्रशांत पब्लिकेशन्सचे संचालक प्रदीप पाटील, उपप्राचार्य डॉ.आर.एस.खडायते यांच्याहस्ते संपन्न झाले.‘लोकरंगभूमी’ हे पुस्तक तृतीय वर्ष कलाशाखेसाठी मराठी विषयांसाठी उपयुक्त आहे.त्याचसोबत विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक आहे.
यापुस्तक प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.अक्षय घोरपडे यांनी केले.यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ.विजयेंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.प्राचार्य डॉ.शिरीष पाटील यांनी पुस्तक लेखनाबद्दल शुभेच्छा देवून लोकरंगभूमी व आजचे विज्ञान युग याबद्दल मत व्यक्त केले.यावेळी प्रशांत पब्लिकेशन्स हे जिल्ह्यातील अग्रणी प्रकाशन संस्था असून दर्जेदार पुस्तक निर्मितीबद्दल त्यांचे आभार मानले गेले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.प्रा.विजयेंद्र पाटील यांना शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सांगता झाली.








