• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमोल शिंदेंनी जनतेच्या प्रश्नावर लोकआंदोलन करावीत – अँड. अभय पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) ;- विधानसभेला पराभव झाल्याचा धक्का अध्याप अमोल शिंदे विसरलेले नाहीत. आ. किशोर पाटील यांनी करोना काळात आपल्या मतदार संघात किराण्यापासून ते औषधांपर्यंत तसेच रेमडेसेवीर पासून फ्रंट लाईन वर्कर्स यांच्यासाठी उकडलेले अंडे पोहाचविण्यापर्यंत आ. किशोर पाटलांनी रात्रीचा दिवस करून परिश्रम घेतले.
तसेच पाचोरा भडगाव मतदार संघात विकास कामांचा तुफान मेल सुसाट ठेवली या सर्व गोष्टीमुळे भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आता आपली डाळ शिजणार नाही याची अमोल शिंदे यांना प्रचंड अस्वस्थता आली असून आमदारांच्या वेगवान कामगिरीमुळे काही विरोधकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे . त्यांना आता चांगल्या मानसोपचार तज्ञाकडून उपचाराची गरज आहे. असा खोचक टोला अँड. अभय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला.
यावेळी किशोर बारावकर,शरद पाटील, गणेश पाटील ,दिनकर देवरे ,चंद्रकांत धनवडे आदी उपस्थित होते.
भाजपचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी आ. किशोर पाटील यांच्यावर बेताल, बेछूट तथ्यहीन आरोप केलेले आहेत. मतदार संघाचा कोणताही अभ्यास न करता आमदारावर केलेले बिनबुडाचे आरोप हास्यास्पद आहेत. अमोल शिंदे यांनी किशोर पाटील यांना दुधाचा भावासंदर्भात जाब विचाराने म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सन २०२० मध्ये भाजपने जिल्ह्यात दुध दर वाढीच्या संदर्भात आंदोलन केले.
अमोल शिंदे यांनी आरोप करतांना वीज मंडळाकडे मागील करोना काळात ऑइल व साहित्य नसतांना अप्पांनी काय प्रयत्न केले असा बाळबोध प्रश्न केला आहे. अमोल शिंदे यांना अध्यक्ष होवून खूप कमी कालावधी झालेला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतर्फे विनंती कि त्यांनी अगोदर मतदार संघासोबतच महाराष्ट्राच्या दैनंदिन समस्याबाबत अगोदर सखोल अभ्यास करावा २०१४ पासून ते २०१९-२० पर्यंत भाजपच्या फडणवीस सरकारने जो कर्जाचा प्रचंड डोंगर उभा करून ठेवला त्यामुळे ३१ मार्च, २०२० ला महाराष्ट्राच्या वीज कंपनीला २६१७१७७ लाख रुपये इतका तोटा झाला होता. त्यामुळे वीज कंपनी आजपर्यंत स्वताला सावरू शकली नाही. अशात मोदींनी महाराष्ट्राच्या हक्काचे GST चे हजारो कोटी रुपये दिलेले नसल्याने व सत्ता स्थापने नंतर लगेचच करोना आजाराने विळखा घातल्यामुळे ठाकरे सरकारला मागील सरकारने केलेला कर्जाचा डोंगर फोडून वीज मंडळासाठी व इतर उपाय योजनासाठी काम करता आलेले नाही. भाजप सरकारने केलेले हे कर्जाचे पाप लपविण्यासाठी किशोर आप्पांवर आरोप करण्याचे उद्योग अमोल शिंदे करीत आहेत.
किशोर आप्पा यांनी आपल्या मतदार संघातील मागण्यांच्या संदर्भात वेळो वेळी सरकारकडे दाद मागितलेली आहे. त्यांच्या लढवय्या व आक्रमक कार्य शैलीमुळे अमोल शिंदे यांची विचार शक्ती नष्ट झालेली आहे. आपण आता मागील निवडणुकीसारखे करोडो रुपये वाटून देखील आमदार होवू शकत नाही. हे सत्य पचविणे अमोल शिंदे यांना फार अवघड झाले आहे. तालुका भाजप मध्ये अमोल शिंदे यांच्या विरोधात जुन्या पदाधिकार्यांचा गट सक्रीय झाल्यामुळे आपले अस्तित्व पक्ष श्रेष्टीपुढे दाखविण्यासाठी जनतेच्या प्रश्नावर सरकारशी रस्त्यावर भांडण्यापेक्षा अमोल शिंदे पत्रकार परिषदा घेत आहेत. असा आरोप अभय पाटील यांनी यावेळी केला.

पाचोरा शिवसेनेतर्फे वीज मंडळाच्या गैर व अनागोंदी कारभाराच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केले गेले. पाचोर भडगाव मतदार संघातील विरोधक जर समर्थ व सक्षम असते व मतदार संघातील जनतेप्रती त्यांना आपल्या जबादारीची जाणीव असती तर बंद खोलीत एसीमध्ये बसून पत्रकार परिषदेमध्ये भीमदेवी थाटात गर्जना करण्या ऐवजी रस्त्यावर उतरून लोकांचे विजे संदर्भात प्रश्न मांडले असते. अमोल शिंदे हे पाचोरा भडगाव तालुक्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही तर ते थेट मुंबई, जळगाव सारख्या ठिकाणी पक्षाने केलेल्या कार्यक्रमात आयते सहभागी होतात. शिंदेच्या या धडपडी बद्दल शिवसेनेला त्यांची कीव येते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.


 

 

Previous Post

सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा – आशिष शेलार

Next Post

महाराष्ट्र सरकार एसटीला देणार 600 कोटी – परिवहन मंत्री अनिल परब

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्र सरकार एसटीला देणार 600 कोटी - परिवहन मंत्री अनिल परब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon