जळगाव (प्रतिनिधी) : लोकअदालतीद्वारे पक्षकारांना मिळणारा दिलासा लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयातर्फे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताह २९ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान होणार आहे. लोकअदालतीमध्ये तडजोडींद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे पक्षकारांसोबत शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ होतो.
लोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आले आहे. न्यायालयातील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे आपसी सामंजस्यातून निकाली काढण्याकरिता लोकअदालत प्रभावी माध्यम म्हणून समोर आले आहे. विशेष लोकअदालतीमार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहे,