जामनेर (प्रतिनिधी)- जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी दहा वाजता जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथील ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात लोकप्रतिनिधी व पशुसंवर्धन मालक यांची संयुक्त बैठकीत आढावा घेऊन वैद्यकीय अधिकार्याना लस पुरेशा प्रमाणात उपल्बध करून देण्याच्या सूचना यावेळी केल्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पशुसंवर्धनावर आलेल्या लपी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊन सर्व पशुसंवर्धन मालकांनी लस्सीकरण ताबडतोब करून घ्यावे ग्रामपंचायत मदत करावी असे आवाहन केले
त्यानंतर पहूर कसबे येथील समाधान कचरे यांच्या बैलाला लपी आजाराने बांधीत झालेल्या बैलाची अभिजीत राऊत यांनी पाहणी केली तसेच येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टर राठोड यांच्याशी येथील परिस्थिती सविस्तर माहिती घेतली लवकरात लवकर अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले
याप्रसंगी सरपंच लोकनियुक्त नीता ताई पाटील, सरपंच शंकर जाधव, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा ,आरोग्यदुत अरविंद देशमुख ,माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे ,शिवसेना प्रवक्ता तथापत्रकार गणेश पांढरे ,उपसरपंच श्याम सावळे ,उपसरपंच राजू जाधव ,माजी उपसरपंच रवींद्र मोरे, मुख्याध्यापक आर बी पाटील, चेतन रोकडे, बंडू पाटील, भाजपा शहराध्यक्ष संदीप बेढे, भारत पाटील पशुवैद्यकीय अधिकारी राठोड, तलाठी जैन ,माजी सरपंच लक्ष्मण गोरे पंचायत समिती सदस्य योगेश भडांगे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.