स्थायी सदस्यांसह महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड
जळगाव [ प्रतिनिधी ] महानगरपालिकाची महासभा बुधवारी 23 रोजी ऑनलाइन होणार होत आहे. यात स्थायी समितीचे सभापतींसह आठ सदस्य निवृत्त होत असल्याबद्दल नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. तर महिला व बालकल्याण समितीच्या 9 सदस्यांची देखील निवड झाली.
आता स्थायी समिती सभापती म्हणून अँड.. शुचिता हाडा आहेत. त्यांच्यासह चेतन सनकत, भगत बालानी, सदाशिव ढेकळे, सुनील खडके, प्रवीण कोल्हे,अँड. दिलीप पोकळे, हे भाजपचे 7 तर शिवसेनेचे विष्णू भंगाळे निवृत्त झाले. तर उर्वरित भाजपचे राजेंद्र घुगे पाटील, रेश्मा काळे, मुकुंद सोनवणे, प्रतिभा देशमुख, नवनाथ दारकुंडे, शिवसेनेचे नितीन बरडे, नितीन लढ्ढा , एमआयएम पक्षाचे सईदा बी हे 8 सदस्य स्थायित कायम आहेत.
नवीन सदस्यांची निवड बुधवारी दुपारी सुमारे 11.30 ला झाली.भाजपचे गटनेते भगत बालानी, सेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी बंद लिफाफ्यात नावे महापौर भारती सोनवणे यांच्याकडे दिली. त्यानंतर नगरसचिव सुनील गोराणे यांनी नावे जाहीर केली. यात भाजपतर्फे ललित कोल्हे, उज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, कुलभूषण पाटील, अमित काळे, सरिता नेरकर, किशोर बाविस्कर तर शिवसेनेतर्फे प्रशांत नाईक यांचे नाव जाहीर करण्यात आले.
तसेच महिला व बालकल्याण समितीवर भाजपतर्फे दिपमाला काळे, सुरेखा सोनवणे, पार्वता भिल, प्रतिभा पाटील, गायत्री राणे, प्रिया जोहरे, रंजना सपकाळे तर शिवसेनेतर्फे शबानाबी खाटीक, जिजाबाई भापसे यांची निवड झाली.