भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ , मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यांमध्ये अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या 20 शाखा युवकांनी तयार केलेल्या असुन लवकरच त्या शाखांचे उदघाटन करण्यात येणार आहे
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीपर्यंत 100 शाखांचे अनावरण करण्याचे या महासंघाचे नियोजन आहे . आचेगावचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय बेंडाळे यांची भुसावळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमात अक्षय बेंडाळे , ऋषिकेश कोलते, आकाश पाटील , रोशन इंगळे , सागर पाटील , मयूर इंगळे , विशाल पाटील , प्रदीप वारके , कुणाल नेमाडे , नरेंद्र पाटील , शुभम पाटील , रुपेश पाटील , प्रतीक इंगळे , प्रणव पाटील , लोकेश पाटील, संकेत वारके , प्रवीण इंगळे , प्रथमेश पाटील , जितेंद्र पाटील , ऋषिकेश पाटील , विशाल नेमाडे , विष्णू इंगळे , चेतन भोळे , कल्पेश पाटील , लोकेश खाचणे , शुभम खर्चे , दशरथ पाटील , गोविंदा पाटील , देवेंद्र इंगळे आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋषिकेश कोलते यांनी केले तर आभार अमोल कोल्हे यांनी मानले .