जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हापेठ पोलिसांनी ५ तासाचे आत मालकाच्या गोडाऊनवर डल्ला मारणाऱ्या दुकानातील मॅनेजर व 2 नोकरांना मुद्देमालासह अटक केली आहे .
1 जानेवारीरोजी विसंजीनगर येथील श्रीनाथ एजन्सी गोडाऊनमधील कलरच्या 7000 रुपये किमतीच्या 3 बकेट चोरी गेल्याची फिर्याद जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती गु र नं 3 / 20220 भादवि कलम 381, 34 अन्वये गुन्हा दाखल होता तपास 5 तासाच्या आत पूर्ण करून गुन्ह्यात प्रथम दुकानात काम करणारा हेमंत सोनवणे यास संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्याची चौकशी केली असता त्याने दुकानातील अकाउंटंट विजेद्र सोनवणे व त्याचा मित्र रफिक पिंजारी यांचे मदतीने कट रचून दुकानाचे गोडाऊनमधून माल चोरी केला असल्याचे सांगितले आरोपी हेमंत सोनवणे याचेकडून कलरच्या 3 बकेट पंचनाम्याप्रमाणे हस्तगत करण्यात आल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री प्रवीण मुंडे , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता ,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेंद्र वाघमारे, हवालदार महेंद्र पाटील, पो ना गणेश पाटील, सलीम तडवी, रवींद्र साबळे, विकास पहूरकर, समाधान पाटील , विनोद पाटील यांच्या पथकाने केली.