जळगाव (प्रतिनिधी) – जुना निमखेडी रोडवरील तात्काळ एलईडी लाईट सुरु करण्यात यावे, अशी मागणी जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील आणि अँड. कुणाल पवार यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. काम तात्काळ पुर्ण न झाल्याच संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.


शहरात एलईडी बसवण्यासाठी सात कोटीचा मक्ता देण्यात आला होता. त्याप्रमाणे शहरात काही ठिकाणी एलईडी बसवलेले. परंतु त्याचा गुणवत्तेच्या बाबतीत शंका आहेत. त्या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक संध्याकाळ स्वच्छ हवा घेण्यासाठी फिरत असतात. परंतु अंधाराचा फायदा घेत बरेच टवाळखोर त्रास देतात. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्याचाच भाग म्हणून निष्पाप संभाजी पाटील यांना जीव गमवावा लागला. त्याकरिता जर स्क्रीन लाईट एलईडी सुरू राहिले असते तर टवाळखोरांना शोधण्यात मदत झाली असती व शतपावली करणाऱ्या मोकळेपणाने फिरता आले असते, असेही निवेदनात शेवटी म्हणण्यात आले आहे.







