जळगाव (प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये अवैध दारूचे धंदे वाढल्याने ते उध्वस्थ करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी याबाबत गुन्हे दाखल करून कारवाई करणेसाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले,यांना आदेश दिले होते. त्यावरुन विविध थक तयार करून गावठी दारूच्या भट्टी उध्वस्त करून गुन्हे दाखल करण्यात आले. सफौ अशोक महाजन, पोहेकॉ जितेंद्र पाटील, महेश महाजन, नितीन बावीस्कर, प्रितमकुमार पाटील आदींच्या पथकाने शहापुर ता. जामनेर शिवारात आरोपी विनोद सुंदरलाल जोशी, नसिर रशीद तडवी दोघे रा. वाकडी ता. जामनेर यांचे जवळील ११०० लिटर कच्चे पक्के रसायन व ६० लिटर तयार गावठी दारु व भट्टीचे साधने असे एकुण ७०,८००/- रु. किं.चा माल मिळून आल्याने त्यांचे वर जामनेर पो.स्टे. गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच शेळगाव ता. जामनेर शिवारात आरोपी नितीन गिरधर कोळी, रा. तळेगाव ता. जामनेर यांचे ताब्यात ७०० लिटर कच्चे पक्के रसायन व ४० लिटर तयार गा.ह.भ.ची दारू व भट्टीचे साधने असे एकुण ४५,२००/- रु. किं.चा माल मिळून आल्याने त्यांचे वर जामनेर पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला.
पथक क्रमांकमधील अनिल जाधव, पोहेकॉ संदीप पाटील, किशोर राठोड, भगवान पाटील, विजय चौधरी यांच्या पथकाने गोंदखेड ता. जामनेर शिवारात आरोपी रामा कौतिक कोळी, रा. गोंदखेड ता. जामनेर यांच्याकडून ३०० लिटर कच्चे पक्के रसायन व २० लिटर तयार गावठी दारू व भट्टीचे साधने असे एकुण १८,८२०/- रु. किं.चा माल मिळून आला. त्याच्यावर जामनेर पो.स्टे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदखेड ता. जामनेर शिवारात आरोपी देविदास आनंदा कोळी, रा. गोंदखेड ता. जामनेर याच्याजवळील ३०० लिटर कच्चे पक्के रसायन व ३० लिटर तयार गावठी दारू व भट्टीचे साधने असे एकुण २०,हजार रु. कि.चा माल मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथक क्रमांक २ मधील सफौ युनुस शेख, पोना रणजीत जाधव, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, कृष्णा देशमुख, प्रमोद ठाकुर यांच्या पथकाने हि कारवाई केली.
मुंदखेडा ता. जामनेर शिवारात आरोपी संजय धनगर पवार, रामहखेडा ता. जामनेर हा १६०० लिटर कच्चे पक्के रसायन व २०० लिटर तयार गा. ह.भ.ची दारु व भट्टीचे साधने असे एकुण ४६,१००/- रु. किं.चा माल मिळून आल्याने त्याच्यावर जामनेर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.