जळगावच्या बोहरी समाजातील ईझी परिवारावर आघात
यावल तालुक्यात आमोदा गावाजवळ घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील धोकादायक ठरत असलेला आमोदा गावाजवळची मोर नदीचा पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रविवारी दि. ६ रोजी सकाळी इंदौरहून कथावाचन कार्यक्रमातून जळगावला येत असताना व जळगावच्या बोहरी समाजाच्या कुटुंबीयांना घेऊन येत असलेली लक्झरी बस मोर नदीच्या पुलावरून उलटून भीषण अपघात झाला आहे. यात ६५ वर्षीय महिला ठार झाल्या असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
फक्रुद्दीन शब्बीरभाई इझी (वय ४३, रा. भवानी पेठ, जळगाव) हे त्यांच्या परिवारासह राहतात. इंदौर येथे धार्मिक कार्यक्रम व कथावाचन महोत्सवासाठी बोहरा समाजातील फक्रुद्दीन ईझी हे त्यांच्या परिवारातील सदस्यांसह शनिवारी इंदौर येथे गेले होते.(केसीएन)तेथून रात्री इंदौर येथील गणेश ट्रॅव्हल्स (एमपी ३० पी ९००९)ने परतत असताना रविवारी दि. ६ जुलै रोजी सकाळी यावल तालुक्यात फैजपूर गावाजवळ बस आली असताना आमोदाजवळ मोर नदीच्या पुलावरून बस खाली कोसळली. या भीषण अपघातात फरीदा शब्बीर हुसेन इझी (वय ६५, रा.भवानी पेठ, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक, क्लिनरसह १० जण जखमी झाले.
आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत बचावकार्य सुरु केले. तर फैजपूर पोलीस स्टेशनचे सपोनि रामेश्वर मोताळे यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर मयत फरीदा इझी यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.(केसीएन)यावेळी ईजी परिवाराने एकच आक्रोश केला. घटनेत २ गंभीर झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तर चालक लखन हिरालाल यादव (वय ३०,रा. सब्जी मंडी गल्ली, तिलक नगर, इंदोर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
जखमींची नावे
फक्रुद्दीन इझी शब्बीरभाई इजी (वय ४३), शिरीन फक्रुद्दीन इझी (वय ३०), ताहेर फक्रुद्दीन इझी (वय १३), बुरहानुद्दीन फक्रुद्दीन इजी (वय १३),(केसीएन), फातेमा मूर्तजा इझी (वय ३३), इनसिया मूर्तजा इझी (वय ६), जहरा अली असगर जकी (वय १२) यांच्यासह चालक, क्लिनर जखमी आहे.