आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग जागरूकता महिनानिमित्त पथनाट्याचे ‘जीएमसी’त सादरीकरण
जळगाव (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग जागरूकता महिनानिमित्त तसेच शासनाच्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे शल्यचिकित्सा विभागाच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी, लवकर निदान झाल्यास जीव वाचतो. त्यासाठी तपासणी लवकर करा. स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी ओपीडी क्रमांक ११४ ला भेट द्या, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. मारोती पोटे, प्रा. डॉ. विश्वनाथ पुजारी, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. मोनिका युनाती, डॉ. सुखदा बुवा, अधिसेविका संगीता शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्तनाच्या कर्करोगाविरुद्ध एकत्र उभे राहणे हि यावेळची थीम आहे. जेव्हा आपण एकत्र उभे राहतो तेव्हा आपण अधिक मजबूत होतो. तुम्ही कर्करोगातून बचावलेले असाल किंवा बदल घडवू इच्छिणारे असाल तर समाजात मदतीसाठी तुमचा आवाज आणि कृती महत्त्वाची असतात, अशी माहिती प्रस्तावनेतून नोडल अधिकारी सहयोगी प्रा.डॉ. संगीता गावित यांनी दिली.
यावेळेला एमबीबीएसचे विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. कर्करोग जीवघेणा जरी असला तरी लवकर निदान झाल्यास कर्करोगातून पूर्ण बरा होऊन रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो असा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. यावेळी सहयोगी प्रा.डॉ. संगीता गावित, सहयोगी प्रा.डॉ. रोहन पाटील, सहायक प्रा.डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी, डॉ. तुषार चौधरी, वरिष्ठ निवासी डॉ. कृतिका मखमले, सहायक अधिसेवक तुषार पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शर्वरी कदम यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. अमेय नेहेते, डॉ. अश्विनी चौरे, डॉ. महेश वाघ, डॉ. संकेत जैन यांच्यासह विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.