जळगाव (प्रतिनिधी) – आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे चोपडा तालुक्यातील 47 लक्ष किमतीचे आदिवासी योजने अंतर्गत सत्रासेन, अंमलवाडी, मोरचिडा, उमर्टी, गौऱ्यापाडा गावठाण सेपरेशन करणे कामाचा शुभारंभ आज दि. 11 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी १२.०० वा. सत्रासेन येथे आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्रासेन येथे पार पडला.
सत्रासेन, सत्रासेन आश्रम शाळा, अंमलवाडी, मोरचिडा, उमर्टी, गौऱ्यापाडा या गावांना योग्य दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने येथील बागायतदार शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते. सदर ग्रामस्थांच्या मागणीचे महत्व लक्षात घेऊन या गावांना 24 तास अखंडीत वीजपुरवठा व्हावा म्हणून आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी गावठाण सेपरेशन सिंगल फेज विज पुरवठा व्हावा या कामासाठी 27 लक्ष निधी उपलब्ध करून दिला.
याप्रसंगी एम.व्ही. पाटील माजी उपसभापती, नगरसेवक प्रकाश दादा राजपूत, शिवसेना तालुका संघटक सुकलाल कोळी, सुनील पाटील, उमार्टि सरपंच धनसिंग पावरा, टेमऱ्या पावरा, विनोद पावरा, दिलीप पावरा, राहूल पावरा, अमोल राजपूत, सागर भोई, शिवाजी पावरा, जाहगा पावरा, चंद्रकांत पावरा, दिलीप कोळी, योगेश जोशी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.