जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील आदर्श नगर परिसरात शिक्षणासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रूममधून अज्ञात चोरट्याने ६८ हजार रुपये किमतीचे चार लॅपटॉप चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केशव अरूण दिवसे मलकापूर तालुक्यात राहत असून सध्या तो आपल्या मित्रांसह शिक्षणासाठी आदर्श नगर भागात आपल्या इतर सोबत्यांसह राहतो . सोमवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते ९.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीत असलेले ६८ हजार रूपये किंमतीचे चार लॅपटॉप चोरून नेल्याचेआल्यानंतर शोध घेऊनही मिळून न आल्याने अखेर २५ तक्रार दिल्यावरून रामांनंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.