प्रचार फेरीतून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव प्रतिनिधी : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार ललित कुमार घोगले यांच्या रूपाने प्रभागाला एक तरुण, तडफदार आणि विकासाची स्पष्ट ‘व्हिजन’ असलेले नेतृत्व मिळाल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


प्रभागातील अनेक सुज्ञ नागरिकांनी महायुतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीने जळगावकरांची घोर निराशा केली असून, प्रभाग १२ मध्ये देखील पुन्हा एकदा निष्क्रिय उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. यामुळे आता परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून सुशिक्षित आणि कार्यक्षम उमेदवाराला पसंती दिली जात आहे.

ललितकुमार घोगले हे तरुण आणि तडफदार नेतृत्व, युवकांचे संघटन आणि प्रश्नांची जाण असलेला उमेदवार आहेत. केवळ रस्ते-गटारीच नव्हे, तर प्रभागाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा मानस त्यांचा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे.व
प्रभागातील रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी आणि एका नव्या ऊर्जेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची आज गरज आहे. त्यामुळे प्रभाग १२ च्या सुज्ञ नागरिकांनी ललित कुमार घोगले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊन आपला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन समर्थकांकडून करण्यात येत आहे.
“प्रभागाचा विकास हीच माझी प्राथमिकता आहे. नागरिकांनी दिलेला विश्वास मी सार्थ ठरवीन आणि प्रभाग १२ ला जळगावमधील एक आदर्श प्रभाग बनवीन.”
— ललित कुमार घोगले









