डॉ. उल्हास पाटील इग्लीश मिडीयम स्कुलचा उपक्रम
सावदा — येथील डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उदघाटन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यामध्ये ड्रॉइंग, क्राफ्ट, इंग्लिश, हिंदी, सोशल सायन्स, संगणक ,सायन्स ,मॅथ्स, पर्यावरण संरक्षण, सौर यंत्रणा, पाणी बचत, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण यासह विज्ञान आणि कलेचे अनेक स्वयंनिर्मित मॉडेल्स सादर केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. मुलांनी तयार केलेल्या मॉडेल्सचे निरीक्षण करून त्यांना प्रोत्साहन दिले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी इतर कार्यक्रमांबरोबरच विज्ञान व कला प्रदर्शनेही शाळेत भरवायला हवीत. यामुळे मुलांमध्ये विज्ञान आणि कलेची आवड जागृत होईल. यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावनाही विकसित होईल असे त्यांनी सांगितले यावेळी शाळेच्या प्रिन्सीपल भारती महाजन यांचेसह शिक्षक शिक्षीका आणि कर्मचारीवृंद उपस्थीत होते.