जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मारून टाकीन…’ अशी शहरातील तरुणीला धमकी दिल्याने एम.आय.डी.सी. पोलीसात तरुणावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुने जळगाव येथील रेहान शेख या तरुणाने शहरात राहणाऱ्या एका तरुणीचा फोन नंबर मिळविला. त्यांनतर फोनवरून संवाद साधत “तू मला भेट, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू मला भेटली नाही तर मी तुला मारुन टाकीन” अशी धमकी दिली. यासंदर्भात तपास करत शनिवारी सायंकाळी रेहान शेख याच्याविरोधात एम.आय.डी.सी. पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
गुरुवारी सायंकाळी रेहान शेख याने शहरातील १९ वर्षीय तरुणीस मोबाईलवरुन संपर्क साधत “तू मला भेट, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू मला भेटली नाही तर मी तुला मारुन टाकीन” अशी धमकी दिली. घाबरत तरुणीने कुटुंबियांना प्रकार सांगितला.शनिवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तरुणीच्या तक्रारीवरून रेहान शेख याच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे हे करीत आहेत.








