वॉशिंग्टन (वृत्तसंस्था ) ;- अवकाशातून पृथ्वीला मोठा धोका निर्माण झाला आहे. एक लघुग्रह प्रचंड वेगाने आपल्या पृथ्वीजवळ येत असल्याचा इशारा नासाने दिला आहे. त्याचे नाव २०२४ एमटी-१ असे असून तो ताशी ६५ हजार २१५ किमी वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. या लघुग्रहाचा व्यास अंदाजे २६० फूट आहे. तो सोमवार, ८ जुलै २०२४ ला पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचण्याची शक्यता आहे.
नासाने २०२४ एमटी-१ हा लघुग्रह प्रथम निअर-अर्थ ऑब्जेक्ट ऑब्जर्वेशन प्रोग्रामद्वारे शोधला होता. हा कार्यक्रम पृथ्वीच्या जवळ येणारे लघुग्रह आणि धूमकेतू यांचा मागोवा घेतो. या वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी जमिनीवर आधारित दुर्बिणी आणि रडार प्रणालीचे नेटवर्क वापरले जाते. २०२४ एमटी-१ च्या शोधाने त्याच्या आकारमानामुळे आणि वेगामुळे खगोल शास्त्रज्ञांची चिंता वाढवली आहे. मात्र तो पृथ्वीवर आदळण्याचा कोणताही धोका नाही, अशी ग्वाही नासाने दिली आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) द्वारे लघुग्रहाच्या मार्गाचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले.
असून जेपीएलचा लघुग्रह वॉच डॅशबोर्ड लघुग्रहाची स्थिती, वेग आणि पृथ्वीपासूनचे अंतर यावर रिअल टाइम माहिती शास्त्रज्ञांना देतो आहे. जेपीएलनुसार, २०२४ एमटी १ पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किमी अंतरावरून जाणार असून हे अंतर जे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतरापेक्षा चौपट जास्त आहे. मात्र या आकाराचे लघुग्रह धोकादायक मानले जातात. कारण ते पृथ्वीवर आदळले तर मोठे नुकसान होऊ शकते. २०२४ एमटी-१ सारख्या लघुग्रहांच्या प्रभावामुळे प्रचंड मोठा स्फोट, आग आणि सुनामी येण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणावर विनाश होऊ शकतो. तथापि, नासाचे प्लॅनेटरी डिफेन्स को-ऑर्डिनेशन ऑफिस
(पीडीसीओ) अशा प्रकारच्या धोक्यांना कमी करण्यासाठी धोरणांवर सक्रियपणे काम करीत आहे. पीडीसीओ हे धोके रोखू शकणारे तंत्रज्ञान तयार करण्यात गुंतले आहे. लघुग्रहांच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी नासाचे डीएआरटी मिशन महत्त्वपूर्ण ठरले आहे. या मोहिमेअंतर्गत एका अंतराळ यानाची एका उल्केला धडक देऊन तिचे संकट टाळण्यात आले होते.