जळगाव (प्रतिनिधी) – नशिराबाद पोलीस ठाण्याचा कर्मचारी सतीश रमेश पाटील (४३, रा. सिध्दी विनायक कॉलनी, पिंप्राळा) याला गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजाराची लाच घेतांना अटक झाली होती. या पोलिसाला पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी शनिवारी सेवेतून निलंबित केले.
या प्रकरणाची चौकशी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सतीश पाटील याला ८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे तीन वाजता नशिराबाद पोलीस ठाण्याच्या आवारातच पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. यात तक्रारदाराकडे १० हजाराची मागणी झाली होती, मात्र तडजोडीअंती पाच हजार रुपये ठरले होते. सतीश पाटील याला न्यायालयाने ११ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.