नाशिक (प्रतिनिधी) :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नाशिक मंडळातील उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारोतराव लांजेवार यांना २० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत विभागाच्या नाशिक पाथकाने रंगेहात पकडण्यात आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. गजानन मारोतराव लांजेवार असे लाच घेणार्या अधिकार्याचे नाव आहे.
गजानन लांजेवार यांनी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी असलेले तक्रारदार यांच्याकडे सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
त्यानुसार त्यांनी लांजेवार यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 च्या कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केल्यास यात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.