जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : तुमचा तिन अपत्यबाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करून तुम्ही अपात्र होणार नाही अशी मदत करतो असे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील २ लिपिकांनी तीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी दि. ९ मार्च रोजी २० हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली आहे.
तक्रारदार रायपूर येथील पन्नास वर्षीय पुरुष आहेत. संशयित महेश रमेशराव वानखेडे (वय ३०, मुळ रा. नेर ता. नेर जि. यवतमाळ) व समाधान लोटन पवार (वय ३५ वर्ष, रा. लालबाग कॉलणी, पारोळा ता. पारोळा) या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई झाली आहे. यातील तक्रारदार हे ग्रामपंचायत निवडणुक २०२१ मध्ये निवडुन आले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे रायपूर गावातील गैरअर्जदार यांनी तिन अपत्य बाबत यांनी तक्रारी अर्ज केला होता. सदरचे प्रकरण हे ग्रामपंचायत विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय येथील लिपिक महेश वानखेडे यांचेकडे प्रलंबित होते.
त्यानंतर तक्रारदार हे वानखेडे यांना त्यांचे कार्यालयात भेटले असता वानखेडे यांनी तक्रारदारांना सांगितले कि, तुमचा तिन अपत्य बाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करून तुम्ही अपात्र होणार नाही अशी मदत करतो. त्यासाठी मला ३० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि. ९ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष पडताळणी केली असता वानखेडे यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केली.
त्यानंतर शनिवारी ९ मार्च रोजी आलोसे वानखेडे यांनी सांगितल्याने संशयित आरोपी समाधान पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात २० हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सुहास देशमुख, पोलिस उप अधीक्षक, तपास अधिकारी पो.नि. एन. एन. जाधव, सफौ दिनेशसिंग पाटील , पो.ना. बाळू मराठे , पोकॉ अमोल सुर्यवंशी, अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ प्रदिप पोळ आदींनी कारवाई केली.