चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील एका मौलानाच्या घरातून ६० हजार रुपये किमतीचे मौल्यवान ऐवज चोरून नेल्याप्रकरणी संशयित आरोपीला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी मुजाहीद जमशेद शेख, (वय-३०, मूळ रा. पिंपरखेड, ह.मु. तरवाडे, ता. चाळीसगांव) यांनी दि. २६ मे रोजी चाळीसगांव ग्रामीण पोस्टेला फिर्याद दिली होती. दि. १६ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे राहते घरातून १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळसुत्राची पोत व ७ ग्रॅम वजनाचे कानातील इयर रिंग्स असे ६०,०००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत.
सदर गुन्हयात आरोपीचा काहीएक धागादोरा गवसत नसतांना चाळीसगांव ग्रामीण पोलीसांनी अवघ्या ५ दिवसांत तपासाची चक्र फिरवून गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीत शाहरुख शेख लाल शेख (वय-२५, रा. तरवाडे, ता. चाळीसगांव) यांस दि. ३० मे ला गुन्ह्याकामी ताब्यात घेऊन अटक करुन त्याची पोलीस कस्टडी मिळविली आहे. त्याच्या ताब्यात गुन्ह्यातील चोरलेला माल १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळसुत्राची पोत व ७ ग्रॅम वजनाचे कानातील इयर रिग्ज असे ६०,०००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण दातरे, कुणाल चव्हाण, पोहेकॉ जयेश पवार, पोहेकॉ युवराज नाईक, पोहेकॉ संदिप ईश्वर पाटील, पोहेकॉ शांताराम पवार, पोहेकॉ विजय शिंदे, पोकॉ सुनिल पाटील सर्व नेम. चाळीसगांव ग्रामीण पोस्टे यांनी केली आहे. पुढील तपास जयेश पवार हे करीत आहेत.