कुसुंबा जकात नाक्याजवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील कुसुंबा जकात नाक्याजवळ एसटी बसने दिलेल्या भीषण धडकेमध्ये दुचाकीवरील महिला व पुरुष जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली असून मृतांमध्ये जामनेर तालुक्यातील चिंचखेडयाचे तरुण आणि महिला जागीच ठार झाले आहेत.
अपघातात मयत झालेल्यांचे झालेल्यांमध्ये गजानन किसन बावस्कर (वय ३८) लीलाबाई धोंडू सोनार (वय ५५) दोन्ही राहणार चिंचखेडा ता.जामनेर यांचा समावेश आहे.दरम्यान या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले असून यात बाळू धोंडू सोनार वय ३५, सुरेखा बाळू सोनार वय ३३ , योगेश धोंडू सोनार वय ३० अशी किरकोळ जखमींची नावे समोर येत आहे.
यावेळी कुसुंबा व चिंचोली गावातील नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली असून नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. सीएमओ डॉ. भोळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
गजानन बावस्कर हे मित्राच्या आईला जळगावात दवाखान्यासाठी घेऊन आले होते. दवाखान्याचे काम आटोपून घरी परतत असताना कुसुंबा जकात नाक्याजवळ एसटी महामंडळाच्या औरंगाबाद डेपोच्या बसने त्यांना मागून धडक दिल्याने ते जोरात फेकले गेले. त्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पितांबर भावसार आदींनी नागरिकांनी धाव घेत सांत्वन केले आहे.