पारोळा ( प्रतिनिधी ) – रजत दीक्षा महोत्सवात धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथे आचार्य सुनीलसागरजी महाराज यांची ७ ऑक्टोंबररोजी महाआरती होणार आहे. त्यांना दिगंबर मुनिश्री दीक्षा घेण्यास २५ वर्ष पूर्ण होत आहे व २६ व्या वर्षात पदार्पण होत आहे
या निमित्त संयम रजत महोत्सव साजरा होत असून भारतभर ठिकठिकाणी हा दिवस उत्साहाने साजरा होत असल्याची माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख व कुंथूनाथ भगवान अतिशय जैन क्षेत्रचे विश्वस्त सतीश जैन यांनी दिली. २५ वर्षाच्या कालावधीत असंख्य दीक्षार्थी घडविणारे देशाला आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे मुनिश्री सुनील सागरजी यांना मानणारा वर्ग मोठा आहे.
कुसुंबा चातुर्मासस्थित असलेले सुदेह सागरजी महाराज यांच्या सानिध्यात ७ ऑक्टोबरला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अतिशय क्षेत्रावर पंचामृत महामस्तकाभिषेक, २४ तीर्थंकर यांची पूजा, आचार्यश्रींची पूजा, विश्वशांतीसाठी शांतीमंत्र वाचन , २४ तीर्थंकरांचे अर्घ्य , पुण्यवाचन, महाआरतीनंतर महा अनुष्ठान, पूज्यश्री यांचे प्रवचन , रात्री शास्त्र वाचन , आरती असे विविध कार्यक्रम होणार आहेत .
सुनीलसागरजी महाराज यांचे शिष्य सोनगीर , भडगाव , धुळे या गावातील महाराज , माताजी यांच्या छत्रछायेत तपस्यारत आहेत याकामी क्षेत्राचे विश्वस्त महेंद्र जैन , मयुर जैन, पंकज जैन, पारस जैन, वालचंद रतनलाल , विपुल जैन, राहुल जैन, राजेंद्र जैन नितीन जैन, चंदू जैन, रोशन जैन, अशोक जैन , शितल जैन, राजेंद्र जैन, वेदांत जैन, गौरव जैन, परम जैन, ओम जैन, कलश जैन, सम्यक जैन, अतुल जैन , प्रमोद जैन, महावीर जैन, किरण जैन, प्रदीप जैन, सुरेंद्र जैन , वर्धमान जैन, गौरव जैन, चिंतन जैन , पार्श्वनाथ सेवा समितीचे व पद्मावती युवा मंचचे सदस्य परिश्रम घेत आहेत.