जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील चोरीच्या गुन्ह्यातील कुसुंबा येथील संशयित आरोपीस आज दि. ७ ऑक्टोबर रोजी जळगावातून अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी रावेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संशयित आरोपी प्रविण प्रल्हाद कुंभार रा. कुसुंबा ता.जि. जळगाव याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५/२०१९ भादवी ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याला अटक करण्यासाठी रावेर पोलीसांनी जळगावातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हेमंत कळसकर आणि चंद्रकांत पाटील यांची सहकार्याने संशयित आरोपी प्रविण कुंभार याला अटक केली. पुढील कारवाईसाठी रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ जितेंद्र नेरकर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.