पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, कुऱ्हाड खुर्द येथील विद्यार्थी हर्षवर्धन रवींद्र पाटील याची राज्यस्तरीय इन्स्पायर्डअवार्ड साठी निवड करण्यात आली आहे. त्याचा शाळेकडून आज सत्कार करण्यात आला
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते चि.हर्षवर्धनचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे व्हा चेअरमन व्हि.टी.जोशी, स्कुल कमिटीचे चेअरमन सतिष चौधरी, मुख्याध्यापक भास्कर बोरूडे , गो.से. हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधिर पाटील , उपमुख्याध्यापिका सौ.प्रमिला वाघ , भाऊसाहेब सिनकर , रवींद्र पाटील , दिपक पाटील, राजू माळी , सुधाकर माळी , पी. एच्. पाटील , सुनील माळी उपस्थित होते.सुत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक सुहास मोरे यांनी केले.