• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निमखेडीतील हत्या अनैतिक संबंधांच्या वादातून : भावाच्या फिर्यादीवरून दोघांना अटक !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 15, 2025
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
निमखेडीतील हत्या अनैतिक संबंधांच्या वादातून : भावाच्या फिर्यादीवरून दोघांना अटक !

जळगाव तालुका पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : येथील निमखेडी शिवारात एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांच्या तीव्र वादातून सागर साहेबराव सोनवणे (वय-३०) या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे भावाने दिलेल्या फिर्यादीवरून उघड झाले आहे. हि घटना रविवार, १५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने दोघांनाही अटक केली आहे.

मयत सागर सोनवणे हा आई-वडील आणि भावासोबत याच परिसरात वास्तव्याला होता. गेल्या जवळपास चार वर्षांपासून सागरचे परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे कुटुंबात आणि परिसरात अनेकदा वाद झाले होते. सागरच्या नातेवाईकांनी त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. दरम्यान, याच महिलेच्या कारणावरून सागर सोनवणे आणि निमखेडी येथील रहिवासी अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे यांच्यात वारंवार वाद होत होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, रविवारी सायंकाळी ६ वाजता अनिल उर्फ शेट्टी नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर (दोघेही रा. निमखेडी) यांच्यात सागरसोबत पुन्हा एकदा जोरदार बाचाबाची झाली.

यावेळी अनिल नन्नवरे आणि संदीप बाविस्कर यांनी सागरला धमकावले होते. “महिलेचा नाद सोड नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी उघड धमकी त्यांनी सागरला दिली होती. सायंकाळच्या या धमकीनंतर काही तासांतच, रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. निमखेडी परिसरातील राम मंदिराच्या आसपास अनैतिक संबंधाच्या जुन्या वादातून आरोपींनी सागर सोनवणे याला गाठले. कोणताही विचार न करता, अनिल नन्नवरे आणि संदीप बाविस्कर यांनी सागरवर धारदार आणि तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होऊन सागर जागीच मृत्युमुखी पडला.

या घटनेची माहिती मिळताच सागरचा भाऊ विशाल सोनवणे आणि इतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला खासगी वाहनाने तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सागरला मयत घोषित केले. यावेळी सागरच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या गंभीर प्रकरणाची फिर्याद मयताचा भाऊ विशाल सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी संशयित आरोपी अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर यांच्या विरोधात खूनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.


 

 

Previous Post

महानगरपालिकांची लागणार आचारसंहिता ?

Next Post

रिक्षाला धडक देऊन तिघांचा मृत्यू : वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रसूतीनंतर सरकारी रुग्णालयात उघडकीस आली घटना : अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी १० जणांवर गुन्हा

रिक्षाला धडक देऊन तिघांचा मृत्यू : वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई
1xbet russia

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon