भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- मध्य रेल्वे दि. १३ जानेवारी २०२५ ते दि. २६ जानेवारी २०२५ या कालावधीत प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळा २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/पुणे – मऊ आणि नागपूर-दानापूर दरम्यान ३४ विशेष गाड्या चालवणार आहे.
१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मऊ कुंभमेळा विशेष (१४ सेवा)
०१०३३ कुंभमेळा विशेष दि. ०९.०१.२०२५, १७.०१.२०२५, २२.०१.२०२५, २५.०१.२०२५, ०५.०२.२०२५, २२.०२.२०२५ आणि २६.०२.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसऱ्या दिवशी २२.०० वाजता पोहोचेल. (७ सेवा)
०१०३४ कुंभमेळा विशेष दि. १०.०१.२०२५, १८.०१.२०२५, २३.०१.२०२५, २६.०१.२०२५, ०६.०२.२०२५, २३.०२.२०२५ आणि २७.०२.२०२५ रोजी मऊ येथून २३.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. (७ सेवा) थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, तलवारिया, चनेरा, खिरकिया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, चक्की मिर्झापूर, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड. संरचना : दोन वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
२) पुणे – मऊ कुंभमेळा विशेष (१२ सेवा)
०१४५५ कुंभमेळा विशेष पुणे येथून दि. ०८.०१.२०२५, १६.०१.२०२५, २४.०१.२०२५, ०६.०२.२०२५, ०८.०२.२०२५ आणि २१.०२.२०२५ रोजी सकाळी १०.१० वाजता सुटेल आणि २१.०२.२०२५ रोजी मऊ येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. (६ सेवा)
०१४५६ कुंभमेळा विशेष ०९.०१.२०२५, १७.०१.२०२५, २५.०१.२०२५, ०७.०२.२०२५, ०९.०२.२०२५, २२.०२.२०२५ आणि २२.०२.२०२५ रोजी मऊ येथून २३.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १६.४५ वाजता पोहोचेल. (६ सेवा) थांबे : दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलवाडिया छनेरा, खिरकिया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, मिर्झापूर , वाराणसी, शहागंज आणि आझमगड. संरचना : दोन वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान , ६ सामान्य द्वितीय श्रश्रेणी/चेअर कार, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
३) नागपूर – दानापूर कुंभमेळा विशेष (८ सेवा)
०१२१७ कुंभमेळा विशेष २६.०१.२०२५, ०५.०२.२०२५, ०९.०२.२०२५ आणि २३.०२.२०२५ रोजी नागपूर येथून सकाळी १०.१० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (४ सेवा)
०१२१८ कुंभमेळा विशेष दि. २७.०१.२०२५, ०६.०२.२०२५, १०.०२.२०२५ आणि दि. २४.०२.२०२५ रोजी दानापूर येथून सकाळी १६.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १९.३० वाजता पोहोचेल. (४ सेवा) थांबे: नरखेड, आमला, बैतुल, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
आरक्षण: कुंभमेळा विशेष ट्रेन क्रमांक ०१०३३, ०१४५५ आणि ०१२१७ साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २०.१२.२०२४ रोजी सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल. या विशेष गाड्यांमध्ये, सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डबे म्हणून चालतील आणि तिकीट यूटीएसद्वारे बुक केले जाऊ शकतात. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा, असे आवाहन करण्यात आले आहे.