जळगाव ( प्रतिनिधी ) – अलिकडच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता हे झपाट्याने विकसित होणारे क्षेत्र बनले आहे. विशेषतः चॅटबॉट्स सखोल संशोधन एजंट्स या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. तंत्रज्ञानाच्या या जलद विकासामुळे अनेक क्षेत्रांसाठी उत्तम संधी उपलब्ध होतात आणि म्हणूनच कुत्रिम बुध्दीमत्ता आणि संशोधन साधने भविष्यातील तंत्रज्ञान असल्याचे मत गोदावरी फॉउंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे सिस्टम अॅडमिनीस्ट्रेटर भुषण चौधरी यांनी व्यक्त केले.
निमीत्त होते गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या आयक्युएसी सेलतर्फे आयोजित एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) ओळख कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्राचार्य विशाखा गणविर यांच्यासह प्राध्यापक आणि विदयार्थी उपस्थीत होते. पुढे बोलतांना त्यांनी ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? कृत्रिम फायदे तोटे याच बरोबर विविध क्षैत्रात याचा होणारा उपयोग परिणामी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सखोल संशोधन साधने ही भविष्यातील तंत्रज्ञानांपैकी एक आहेत आणि ती व्यवसाय जगताची गतिशीलता बदलत आहेत. व्यवसायांच्या यशात या साधनांचा प्रभावी वापर महत्त्वाची भूमिका बजावतो असे त्यांनी सांगितले. विदयार्थ्यांच्या शंकाचे निरसन करतांना या तंत्रज्ञानाचा उपयोग कश्या पध्दतीने व कोणत्या साधनाव्दारे केला जातो हे चित्रफितीव्दारे विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा प्रियदर्शीनी मून यांनी मानले यशस्वीतेसाठी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला वक्ते भुषण चौधरी यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.