धरणगाव ( प्रतिनिधी ) — केंद्र सरकारने संमत केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज येथे किसान मोर्चातर्फे रॅली काढून निवेदन देण्यात आले.
किसान मोर्चाच्या पदाधिकार्यांनी शहरातून मोर्चा काढला. नंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. कृषी उत्पादनांना किमान हमी रक्कम इतका भाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणावे, देशभरातील निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर टाळून आधीप्रमाणे मतपत्रिकेने निवडणुका घेण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, तालुकाध्यक्ष बाळू चौधरी, वाल्मीक पाटील, आबासाहेब वाघ, प्रमोद पाटील, जितेंद्र चौधरी, निंबा कुंभार, श्रीकांत पाटील, गौतम गाजरे, निलेश पवार, शरद पाटील, दीपक मराठे, अरविंद चौधरी, गोपाळ चौधरी, अरूण पाटील, वाल्मीक पाटील, भागवत चौधरी, महेंद्र भोई, रामचंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.