दुबई (वृत्तसंस्था) – किंग्स इलेव्हन पंजाबचा अष्टपैलू खेळाडू आणि यूनिव्हर्सल बॉस म्हणून स्वत:ची ओळख सांगणारा ख्रिस गेल सध्या रुग्णालयात दाखल आहे. इन्टाग्रामवर फोटो शेअर करत गेलनेच याबाबत माहिती दिली आहे.
गेलला अन्नातून विषबाधा झाली होती. गेल त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, मी कधीच लढल्याशिवाय माघार घेणार नाही. मी यूनिव्हर्सल बॉस आहे आणि हे सत्य कधीच बदलणार नाही.
गेल पुढे म्हणाला, तुम्ही माझ्याकडून नक्कीच शिकू शकता. मात्र ज्या गोष्टी मी करतो त्या सर्वच तुम्ही फॉलो करु नका. पण माझी स्टाईल लक्षात ठेवा.