मकर संक्रांतीनिमित्त कार्यक्रम, वैशाली सुर्यवंशी यांची माहिती
पाचोरा (प्रतिनिधी) :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेते न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा फेम क्रांती नाना मळेगावकर व बाल गायिका टी. व्ही. स्टार सह्याद्री मळेगावकर हे येणार असल्याची माहिती वैशाली सुर्यवंशी यांनी शिवतीर्थ शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, राजेंद्र राणा, मंदाकिनी पारोचे, कुंदन पंड्या, जयश्री येवले, नाना वाघ, संतोष पाटील उपस्थित होते.
तालुक्यातील महिलांना एक विरंगुळा म्हणून कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा फेम सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बाल गायिका टी. व्ही. स्टार सह्याद्री मळेगावकर हे असणार आहे. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील भडगाव रोडवरील कैलामाता मंदिराजवळील मैदानावर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. महिलांसाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात प्रथम बक्षीस एल. ई. डी. टी. व्ही. , द्वितीय बक्षीस पिठाची गिरणी, तृतीय बक्षीस गॅस शेगडी, चतुर्थ बक्षीस मिक्सर व पाचवे बक्षीस इस्त्री देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा शहरासह तालुक्यातील महिलांना लाभ घ्यावा असे आवाहन वैशाली सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.