कोविड शिष्टाचार रद्द करण्याच्या मागणीसाठी निदर्शने
जळगाव – कोविड शिष्टाचार रद्द करणे, लसीकरणातून अपंगत्व आलेल्यांना शासनाने नुकसान भरपाई देणे आणि साथ व आपत्ती व्यवस्थापन कायदे मागे घेण्याची आग्रहाची मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवार 17 जानेवारी रोजी निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कोरोना हे षड्यंत्र असून लसीकरणाची सक्ती नियमबाह्य असल्याची भूमिका, तसेच लसीकरण आतून अपंगत्व आलेल्यांना शासनाने भरपाई देणे या मागणीची भूमिका वेळोवेळी ‘देशोन्नती’चे संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांनी घेतलेली आहे. त्यांच्या या आवाहनाला अनुसरूनच येथे हे अभिनव आंदोलन लोकशाही पद्धतीने आज करण्यात येऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देशोन्नतीचे आवृत्ती संपादक मनोज बारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. सक्तीचे लसीकरण थांबवा. लसीकरणामुळे अपंगत्व आलेल्यांना शासकीय मदत मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे.लस न घेतलेल्यांना विविध ठिकाणी प्रवेश न देणे तातडीने थांबवा..विविध निर्बंध दूर करा.अशा फलकांसह घोषणा देण्यात आल्या. यावेळी अनेकांनी ही भूमिका समजून घेतली. यावेळी रिपाईचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, युवक महानगराध्यक्ष मिलिंद सोनवणे, मुकेश सपकाळे, अभय मेघे, प्रदीप बनसोडे, अविनाश पारधे, रवींद्र पाटील, पिंपळगाव हरेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार किशोर लोहार, योगेश सुने, परशुराम पाटील, संदीप बारी, भगवान माळी आदी सहभागी झाले होते.
आज मानवी संस्कृती सार्वत्रिक कोविड लसीकरणामुळे पुसली जाण्याचा धोका आहे. जगातील प्रमुख शास्त्रज्ञ व डाॅक्टर लसीकरण थांबवण्याचे कळकळीचे आवाहन करत आहेत. अशा कसोटीच्या काळात सर्वांनी मानवजातीला वाचवण्यासाठी आपली भूमिका बजावावी. तरी तात्काळ लसीकरणाची सक्ती मागे घेण्यात यावी व लसीकरण प्रमाणपत्र अभावी मिळणाऱ्या सुविधा बंद करण्यात आल्याने त्या तात्काळ सुरू करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.